बदलापूरमध्ये २ चिमुकलींवर अत्‍याचार, नागरिक उतरले रस्‍त्‍यावर Pudhari Photo
ठाणे

बदलापूरमध्ये २ चिमुकलींवर अत्‍याचार, नागरिक उतरले रस्‍त्‍यावर

निलेश पोतदार

बदलापूर : पुढारी ऑनलाईन

बदलापूरमध्ये एकाच शाळेतील साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्‍याचार झाल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बदलापूरकर संतप्त झाले आहेत. संतप्त आंदोलकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसचे बदलापूर स्‍टेशनवर रेल रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलकांकडून बदलापूर बंदची हाक

या घटनेने संतप्त झालेल्‍या बदलापूरकरांनी यावेळी बदलापूर बंदची हाक दिली. आंदोलकांना शांत करण्याचे पोलिसांनी प्रयत्‍न केले. मात्र या घटनेतील आरोपीसह शाळेविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीवर आंदोलक ठाम होते. दरम्‍यान शाळेच्या मुख्याध्यापिकेसह दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

बदलापूर रेल्‍वे स्‍टेशनवर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रेल्‍वे रूळावर आंदोलन केले. यामुळे येथील रेल्‍वेसेवा ठप्प झाली आहे. बदलापूर रेल्‍वे ट्रॅकवर संतप्त आंदोलक उतरले असून, हातात फलक घेत आंदोलकांनी आरोपीला आमच्यासमोर हजर करा अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT