ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणाच्याही संपर्कात नव्हते. दिल्लीतील बैठक संपल्यानंतर ते थेट आपल्या दरे गावी गेले. तेथून परतल्यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नसून आज मंगळवार (दि.3) त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना घशाचा संसर्ग झाला असून ताप आणि अशक्तपणा असल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नाही. त्यांना घशाचा संसर्ग झाला आहे, कफ झाला आहे. त्यांना थोडा ताप आहे. आम्ही दिल्लीत गेलो होतो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर होतो. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला त्यांना दिला आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून सव्वादोन वर्ष सातत्याने त्यांनी काम केलं आहे. शेवटी ती पण एक व्यक्ती आहे. इतका ताण शरीरावर दिल्यानंतर प्रकृती खराब होणं साहजिक आहे”शंभूराज देसाई, शिवसेना शिंदे गट
आम्ही शिंदे यांना पाहायला गेलो होतो तेव्हा त्यांना सलाईन लावली होती. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रातींचा सल्ला दिला आहे. सोमवार (दि.2) त्यांच्या रक्ताचा नमुना घेतला आहे. त्यात काय निघाले याबाबत अजून कळालेले नाही. आता त्यांची सर्व तपासणी होतील. ५ तारखेच्या शपथविधीला त्यांनी जायचे की नाही हे डॉक्टरच निर्णय देतील ठरवू शकतील. आम्ही सर्व आमदार एकत्रितपणे याबाबत निर्णय घेणार आहोत.संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गट