Illegal food stock worth 2 crore seized in Bhiwandi 
ठाणे

Illegal food stock worth 2 crore seized in Bhiwandi|भिवंडी ग्रामीम मधून 2 कोटी रूपयांचा अन्नपदार्थांचा अवैध साठा जप्त

भिवंडी ग्रामीम मधून 2 कोटी रूपयांचा अन्नपदार्थांचा अवैध साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे /मुंब्रा : पुढारी वृत्तसेवा

अन्न पदार्थावरील उत्पादनाची आणि कालबाह्य झालेली तारीख (एक्सपायरी डेट) नष्ट करून पुन्हा त्या पदार्थावरील तारखा बदलून ग्राहकांच्या आरोग्याला बाधा होईल, अशा अन्नपदार्थांचा सुमारे 2 कोटी 6 लाख, 21 हजार 245 रूपयांचा साठा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभाग -10 चे सहाय्यक आयुक्त योगेश ढाणे यांनी 18 व 19 नोव्हेंबर रोजी में. डीएक्सपी व्हेन्चर इंडिया प्रा. लि. च्या गोदामावर धाड टाकली. या कारवाईत अन्नपदार्थांच्या पॅकेंजिगवर फेरफार होत असल्याची बाब उघडकीस आली.

थिनर या रासायनिक पदार्थांचा वापर करून पदार्थाच्या पॅकेजिंगवरील मूळ उत्पादन तारीख, कालबाह्यता तारीख आणि विक्री किंमत (एम. आर.पी) मिटवून टाकली जात असल्याचे निर्दशनास आले. या तारखा पुसून टाकल्यानंतर पुन्हा सुधारित तारीख आणि किंमती टाकण्यात येत होत्या. छाप्याच्या ठिकाणी किंमतीचे शिक्के आणि थिनर सारख्या वस्तू आढळून आल्या.

या पध्दतीने उत्पादनाची विक्री केल्यास ग्राहकाच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकते, हे लक्षात घेवून अन्न प्रशासनाने या प्रकरणातील प्रत्येक बाबीची कागदपत्रे, साठा, लेबल याच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

या कारवाई दरम्यान स्पार्कलिंग वॉटर, एनर्जी ड्रिंक, सौदी कॉकटेल सोडा वॉटर, जिंजर सोडा, गीर गाईचे तुप असे 14 प्रकारचा अन्न पदार्थांचा साठी जप्त करण्यात आला आहे. तपासातील गंभीर बाबी, साठ्याची स्थिती आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने विचार करून मे. डीएक्सपी व्हेन्चर्स इंडिया प्रा. लि. या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे ठाणे विभाग क्रमांक 10 चे सहाय्यक आयुक्त वाय. एच. ढाणे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी के. वाय. चिपळूणक, ए. व्ही. कांडेलकर यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT