ठाणे ः अवैधरित्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणार्या उल्हासनगर येथील एका सौंदर्य प्रसाधनाच्या विक्रेत्यावर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने सुमारे 1 लाख 32 हजार 888 रूपयांच्या साठा जप्त केला आहे.
उल्हासनगर येथील मे. ब्युटी बँड येथे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सौंदर्य प्रसाधनाची विनापरवानगी विक्री होत असल्याची माहिती औषध प्रसाधनाच्या गुप्त वार्ता विभागाला माहिती मिळाली होती. या धाडीत सुमारे 1 लाख 32 हजार 888 रूपये किंमतीची सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली. औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रोहित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक एस.एस.भुजबळ, गुप्त वार्ता विभागाच्या रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, औषध निरीक्षक (गुप्तवार्ता विभाग) अहिल्यानगर जावेद शेख व औषध निरीक्षक (गुप्तवार्ता विभाग) मनीष गोतमारे यांनी ही कारवाई केली.
याशिवाय असाध्य आजार बरे करण्याचा दावा करून औषधांची विक्री करणार्या उल्हासनगर येथील कस्तुरी आयुर्वेद या पेढीवरही धाड टाकण्यात आली. या पेढीतून ल्युको लॉक नावाचे आयुर्वेदिक औषध ताब्यात घेण्यात आले आहे. या औषधाची किंमत 540 रूपये असली तरी यापुढील तपासात उत्पादकापर्यंत पोहचून पुढील कारवाई औशध प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
औषध निरीक्षक जोसेफ चीरामल यांनी औषधे व जादुटोनादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यानुसार त्याची दखल घेण्यात आली आहे. सह आयुक्त भुषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (गुप्तवार्ता) वि. आर. रवि, सहायक आयुक्त निशिगंधा पाष्टे व सहायक आयुक्त रोहित राठोड यांनी ही कारवाई केली.
उल्हासनगर येथील में. ब्युटी बँड येथे आंतरराष्ट्रीय कंपन्यांची सौंदर्य प्रसाधनांची विक्री अवैधरित्या केली जात होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत आयुर्वेदिक औषधांची विक्री केली जात होती. औषधे व जादुटोनादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) या कायद्यानुसार 54 प्रकारच्या आजाराचा समावेश यात आहे. रूग्ण बरे होण्याचा दावा करून या औषधांची विक्री केली जात होती. उत्पादकांपर्यंत तपास करण्यात येणार आहे.व्ही. आर. रवी, सहाय्यक आयुक्त, गुप्तवार्ता विभाग, मुंबई