कोपरखैरणेत अनधिकृत बांधकामे अधिक pudhari photo
ठाणे

Illegal construction : कोपरखैरणेत अनधिकृत बांधकामे अधिक

जुलैच्या पाहणीनुसार नवी मुंबई पालिकेकडून 70 जणांना नोटिसा

पुढारी वृत्तसेवा

वाशी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात येत असून तोडक कारवाई करण्यात येत आहे. जुलै महिन्यात पालिकेने केलेल्या पाहणीत शंभरपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे आढळली असून यात कौपरखैरणेतील 70 बांधकामांचा समावेश आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत याचिकेतील सुनावणीत शहरात 5 हजार अनधिकृत बांधकामे असल्याचे सांगितले आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने गेल्या 4 महिन्यांपासून बांधकामांचा शोध घेवून कारवाई सुरू आहे.

दर महिन्याला पाहणी करण्यात येत आहे. जुलै महिन्यातील पाहणीत एकट्या कोपरखैरणेत 70 बांधकामे आढळली आहेत. यात बहुतांश बांधकामे गरजेपोटी बांधलेली आहेत. त्यामुळे रहिवाशी चिंतेत आहेत. तर या घरांवर कारवाई करू नये यासाठी नुकताच मोर्चाही काढण्यात आला आहे.

जुलैच्या पाहणीत कुठे किती अनधिकृत बांधकामे?

बेलापूर - 2

नेरूळ - 2

वाशी - 2

तुर्भे -16

कोपरखैरणे - 70

घणसोली - 6

ऐरोली - 12

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT