ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.14) रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि तृणमूल काँग्रेसचे आयुक्त सौरभ राव आणि आदी मान्यवर पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
“बाबासाहेब हा आपला श्वास आहे. बाबासाहेब हा आपला दीपस्तंभ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि बंधुतेचा संदेश दिला. अनेक देशातल्या घटनेचा अभ्यास करून त्यांनी सर्वोत्कृष्ट घटना लिहिली. भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता. मर गए होते युँ ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता”, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकत मनोगत व्यक्त केले.