मिरा रोड ः भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात एका बांधकाम साईटवर राहत असलेल्या नवरा बायकोच्या झालेल्या भांडणात नवर्याने बायकोवर प्राण घातक हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केल्याने खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपी शिवकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.
हा खुनाचा थरार भाइंदर पूर्व येथील इंद्रलोक परिसरात नम बिल्डिंग कन्ट्रक्शनच्या आवारात झाला. या भागात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कामगारांना राहण्यासाठी येथे तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे. यात हे पती पत्नी राहत होते. या ठिकाणी 23 जूनच्या सकाळी 10 च्या सुमारास शिवकुमार संपत हरिजन (30) व त्याची पत्नी पूजा शिवकूमार हरिजन (25) यांच्यात भांडणे झाली. यावेळी पत्नीवर बांधकाम साहित्यापैकी लोखंडी शिगेने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुरावा नष्ट करून आकस्मि मृत्यूची नोंदही केली.
पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर शिवकुमार संपत हरिजन याने पत्नीला मारल्याचे सत्य पुढे आले. या प्रकरणात मयत महिला पूजा शिवकूमार हरिजन हिच्या वडिलांनीही आपल्या मुलीचा खून झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी खून करणे आणि पुरावा नष्ट करणे आरोपाखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक धीरज कोळी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोमे हे करत असून हा खुनाचा थरार पोलिसांनी उघड केला आहे.
भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परीसरात नम बिल्डिंग कन्ट्रक्शनची नवीन इमारत बांधकाम सूरु आहे. या साईटच्या बाजुला तात्पुरत्या पत्राच्या खोलीत पती-पत्नी राहत होते. त्याठिकाणी 22 जून रात्री ते ते 23 जून सकाळी 10 च्या दरम्यान शिवकुमार संपत हरिजन (30) व त्याची पत्नी पूजा शिवकूमार हरिजन (25) ह्यांच्यात कोणत्यातरी कारणांवरुन भांडण झाले. या भांडणात तिला कशानेतरी मारहाण करुन तीला जिवे ठार मारुन पुरावा नष्ट केला. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.