कसारा : शाम धुमाळ
जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खर्डी (दळखन) येथे मंगळवार (दि.11) रोजी इयत्ता १२ वी च्या परीक्षेस सुरुवात झाली. परीक्षा केंद्रावर 417 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत.
बोर्ड परीक्षा तणावमुक्त व भयमुक्त निकोप वातावरणात पार पडण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी शिवकुमार जाधव (पोलिस उपनिरीक्षक खर्डी) अमेय आठवले, अनिल घोडविंदे, प्रशांत घोडविंदे, नरेश जाधव, अजय सिंग, भगवान मोकाशी, कायनात सय्यद, (उपसरपंच, दळखण) प्रा. कैलास कळकटे यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा देऊन विधायक दृष्टिकोनातून पेपरला सामोरे जा व यशाला गवसणी घाला असा अनमोल संदेश दिला. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आलेले टेंशन गायब झाल्याचे पहावयास मिळाले.