ठाणे

ठाणे जिल्ह्यात मुसळ’धार’, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

मोहन कारंडे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पहाटेपासून धुवाधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील दोन महत्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उल्हास आणि काळू नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. तर उल्हास नदीवरील अंबरनाथ मधील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.

अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक ११४ मी मी पाऊस पडला असून उल्हासनगर तालुक्यात ११० मी मी, ठाणे ७५, कल्याण ९८, मुरबाड ६३ मी मी, भिवंडी ७९ मी मी तर शहापूरात ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT