मुरबाड शहर ( ठाणे ) : मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक गोरखगड येथे मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या सोलापूर येथील २४ वर्षीय ऋषिकेश राजेंद्र जाधव या तरुणाचा ट्रेकिंग दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.20) सायंकाळी घडली असून रेस्क्यू टीमच्या साहाय्याने रात्री उशिरा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले.
प्राप्त माहितीवरून, ऋषिकेश राजेंद्र जाधव हा नवी मुंबई येथे आपल्या मामाकडे आला असता मित्रांसोबत तो गोरखगडावर फिरण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. पायातील बुटांना अपेक्षित ग्रीप न मिळाल्याने व रस्ता चिकट झाल्याने त्याचा तोल जाऊन तो पडल्याचे सांगण्यात येते. गडावरून खाली उतरत असताना पाय घसरल्याने अंदाजे शंभर ते सव्वाझ फूट निसरड्या खोल दरीत पडल्याने ऋषिकेश याला गंभीर दुखापत झाली व त्यातच त्याचा वेदनादाय मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यान आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी (दि.21) पहाटे साडे तीन वाजता मृतदेह खोपवली गावात आणला. दीपक विशे, प्रताप गोडांबे, कमळू पोकळा, रवी भला, भास्कर मेंगाळ व खोपिवली ग्रामस्थ असे आम्ही एकूण सात जण होतो. गावाजवळच्या शेतांकडे आल्यावर गावातील तरुणांनी मदत केली. मृतदेहासोबत असलेली इतर 9 लोक खूप घाबरली होती, त्यांनाही खाली उतरवायला मदत करायची होती.कुसुम विशे, गिर्यारोहक टीम ऍडव्हेंचर साह्यगिरी, मुरबाड.