कल्याणमधील मुलीवर आईच्या मित्राकडून अत्याचार  File Photo
ठाणे

कल्याणमधील मुलीवर आईच्या मित्राकडून अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याणमध्ये राहणाऱ्या माय-लेकी उत्तराखंडातील ऋषिकेश येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. पर्यटनादरम्यान पिडीत मुलीच्या आईचा मित्र देखील होता. या तिघांनी ऋषिकेशमध्ये पर्यटन केल्यानंतर हॉटेलमध्ये मुक्कामी असताना मित्राने आपल्या मैत्रिणीच्या सहमतीने तिच्या अल्पवयीन मुलीला पाण्यात गुंगीचे औषध टाकून दिले. यानंतर मुलगी बेशुद्ध असल्यानंतर आईच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी शुध्दीत आल्यावर तिला आपल्या सोबत घडलेला प्रकार समजला. हा सर्व प्रकार एप्रिल 2022 ते एप्रिल 2024 या कालावधीत घडला.

या घटनेनंतर आई आणि मुलगी कल्याणमध्ये आल्यानंतर पिडित मुलीने घडलेली सर्व घटना तिच्या वडिलांना सांगितली. यानंतर संतप्त वडिलांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात पत्नी आणि तिच्या मित्रांविरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा सगळा प्रकार उत्तराखंड ऋषिकेश परिसरातील लक्ष्मण झुला पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. त्यामुळे खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याची सर्व कागदपत्रे पुढील तपासासाठी उत्तराखंडकळे पाठविण्याची कार्यवाही कल्याणच्या पोलिसांनी सुरू केली आहे. महिलेच्या पतीने या संदर्भात तक्रार अर्ज खडकपाडा पोलिसांना दिला होता. सदर अर्जाच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई आहे की वैरीण ?

स्वतःवर बेतलेला प्रसंग या मुलीने तिच्या वडिलांना सांगितला. पोटच्या पोरीला मित्राच्या ताब्यात देऊन तिची इभ्रत लुटताना उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या पत्नीबद्दल प्रचंड घृणा निर्माण झालेल्या पिडीत मुलीच्या पित्याने खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पत्नीसह तिच्या मित्राविरूध्द दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एन. घस्ते अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाचा उत्तराखंड आणि खडकपाडा पोलिस संयुक्तरित्या चौकशी करणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT