Ghodbunder Road Kasarvadavali Flyover pudhari photo
ठाणे

Thane Road Safety : घोडबंदर रोड कासारवडवली उड्डाणपूल धोकादायक

उड्डाणपूल अवघ्या आठ महिन्यातच खचल्याने गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा : घोडबंदर रोड कासारवडवली उड्डाणपूल धोकादायक ठरला असून हा उड्डाणपुल अवघ्या आठ महिन्यात खचल्याने वाहतुकीसाठी गैरसोयीचा ठरत आहे.

घोडबंदर रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि येथील नागरिकांना वाहतुकीच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी एम एम आर डी ए कडून बांधण्यात आलेला उड्डाणपुल अवघ्या आठ महिन्यात खचला. यामुळे वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल केव्‍हा खुला होणार या प्रतीक्षेत वाहनचालक आहेत.

वास्तविक ८ जुलै रोजी मोठ्या थाटामाटाने महाराष्ट्र शासनाच्याकडून उद्घाटन करण्यात आलेला घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील उड्डाणपूल अवघ्या आठ महिन्यात दुरुस्तीच्या नावाखाली ऐन गणेशोत्सवाच्या काळात बंद करण्यात आला. ११ सप्टेंबर रोजी बंद करण्यात आलेला हा उड्डाणपूल आजही सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेला दिसून येत आहे.

दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलेल्या या उड्डाणपुलावर लोकप्रतिनिधी राजकीय प्रतिनिधी सामाजिक प्रतिनिधी यांना कामकाजाची पाहणी करण्यापासून कॉन्ट्रॅक्टर जयकुमार आणि एम एम आर डी ए प्रशासनाकडून मज्जाव केला जातोय, सदर डागडुजीचे आणि दुरुस्ती बाबत माहिती देण्यापासून अधिकारी पळवाट काढतायेत, पत्रकारांना वृत्तवाहिनीना पुलावरील कामकाज आढावा घेण्यापासून मज्जाव केला जातोय.

जवळजवळ ८० ते १२० टन वजनी वाहतुकीच्या क्षमतेचे प्रमाणपत्र देण्यात आलेले असताना देखील उड्डाणपुलाला अवघ्या ६ महिन्यात तडे गेले तसेच उड्डाणपुलाखालील माती खचल्याची माहिती जे. कुमार यांचे अभियंता शारदाप्रसाद यांच्याकडून मिळत आहे.एकंदरीतच उड्डाणपुलाच्या कामाची गुणवत्ता खालावलेली आहे आणि निकृष्ट दर्जाची असल्याचे आता समोर आलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT