कल्याण येथून गणपत चिमाजी शेलकन्दे हे आपल्या मित्रांसह शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या खाली पार्टीसाठी आले होते. शनिवारी दुपारी MH 10 S 4455 या गाडीने गटारी पार्टी साठी आले होते. यावेळी धरणाच्या मागील बाजूला गाडी लावून पार्टी चे नियोजन सुरु असताना अचानक धरणाचे स्वयंचलित दरवाजे काही अंशी उघडले गेले आणि पाण्याचा लोट तानसा नदी च्या दिशेने वाहू लागला. काही समजण्या अगोदरच गाडी पाण्याखाली जाऊन वाहू लागली गाडीत पाणी घुसत असल्याचे लक्षात येताच गाडीत असलेल्या 5 जणांनी उडया मारल्या. त्यापैकी 3 जन सुखरूप बाहेर आले, तर एक तरुण गुदमरून मयत झाला तर अन्य एकटा अद्याप बेपत्ता असल्याची घटना घडली. याचा शोध सुरू असून शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत