Ganesh Naik challenge Shiv Sena
ठाणे : आयुष्यात केलेले पाप हे माझ्या खांद्यावर घेऊन फिरतो, दुसऱ्यावर खांद्यावर देत नाही, मी सर्व गोष्टींना सज्ज आहे, कसली वाट पाहत आहात, माझा कुठला व्हिडिओ फ्लॅश करायचे ते तुम्ही आत्ताच करा, वाट कसली बघत आहात, असे प्रतिआव्हान वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेनेच्या नेत्यांना दिले आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांचा आज (दि.६) चौथा जनता दरबार ठाण्यात संपन्न झाला. यावेळी पत्रकारांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री नाईक यांनी जो आपल्या पदाशी कर्तव्य, बांधिलकीने, प्रामाणिकपणे नीट काम करीत नाही, तो त्या पदाला लायक नाही, तो नालायक आहे, याचा पुनरुच्चार केला. मी कुणाचे नाव घेतलेले नाही असेही म्हणाले. त्यामुळे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी माझ्या आयुष्यातील पापाचे व्हिडिओ आताच लावावे, असे प्रतिउत्तर दिले आहे.
1990 मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो आणि गेले 35 वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय माझी आयुष्यात किती आले आणि गेले. काहींना आठवत देखील नाही. मी मानसिक दृष्ट्या सक्षम आहे. शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या ही सक्षम आहे. मला कुठल्या ईडीची, तपास यंत्रणेची भीती नाही, असे सांगून शिवसेनेचे खासदार म्हस्के यांना प्रतिआव्हान दिले.
जनता दरबार मध्ये नागरिकांचे प्रश्न सुटतात जर अधिकाऱ्यांना ते प्रश्न सोडवायची इच्छा नसेल. त्यांना यायचं नसेल तर जनता दरबार बंद करून असेही मंत्री नाईक यांनी म्हटलेले आहे. 90 टक्के अधिकारी हे प्रामाणिक आहेत, दहा टक्के अधिकारी हे नालायक असतात. ज्याप्रमाणे ठाणे महापालिकेत उपायुक्त व वसई विरार महापालिकेतील आयुक्तांना लाच घेताना अटक केली आहे. न्यायमूर्तीकडे ही पैसे सापडतात. मग न्याय कुणाकडे मागायचे ? हे आपले दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले.
जनतेची रखडलेली कामे ही जनता दरबारामुळे सुटत आहेत, ती कामे अधिकारीच करतात. त्यांच्यावर जनता दरबाराच्या माध्यमातून मानसिक दबाव अधिकाऱ्यांवर तयार होतो आणि ते जनतेची काम करत असतात. आम्ही फक्त माध्यम आहोत, असे सांगून नाईक यांनी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.