बदलापुरातील स्त्रीबीजतस्करी प्रकरणी चौथी अटक File Photo
ठाणे

Thane Crime : बदलापुरातील स्त्रीबीजतस्करी प्रकरणी चौथी अटक

महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोनल गरीवाल या महिलेला अटक केली. त्या प्रकरणात अवैधरित्या सोनोग्राफीसाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात याआधी पोलिसांनी तीन महिलांना अटक केली होती. यातील सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनल गरेवाल (वय 25) या आणखी एका महिलेला अटक केली आहे.

या चौघींच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असल्याचे उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.

बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणी आयव्हीएफ सेंटर तसेच हे खरेदी विक्री करणाऱ्या आणि यात सहभागी असलेल्या डॉक्टर आणि इतर यंत्रणापर्यंत पोलिसांचे हात पोहोचणार की कायद्याचे हात आखूड पडणार हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT