ठाणे

Thane | ट्रकची धडक वाचवायला गेला अन् पुलावरून पडून वाहून गेला

पुढारी वृत्तसेवा

पालघर : मुंबई -अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी अडकल्याने दुर्वेस वरून चालत मस्तान नाक्याच्या दिशेने पायी चालत जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकच्या धडक वाचवण्याच्या प्रयत्नात पुलावरून वैतरणा नदीपात्रात पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. रविवारी (दि.१४) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून रात्रीची वेळ असल्याने तरुणाचा शोध घेण्याच्या कामाला मर्यादा निर्माण झाल्या आहेत.

महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकल्याने कोंडीची माहिती घेण्यासाठी दुर्वेस गावच्या हद्दीतील वैतरणा नदीवरील (Vaitrana river) पुलावरून त्याच्या मित्रासोबत चालत निघाला होता.चालत जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात पुलावरून वैतरणा नदी पात्रात पडला.

कैलास मढवे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील चिंचणी गावचा रहिवासी होता. कैलास चिंचणी गावातील त्याच्या मित्रांसोबत एकविरा देविच्या दर्शनाला गेला होता. परतीच्या प्रवासा दरम्यान रविवारी (दि.१४) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावाच्या हद्दीतील वाहतूक कोंडीत त्यांची कार अडकली होती.

वाहतूक कोंडीचे कारण जाणून घेण्यासाठी कैलास आणि त्याचा मित्र कार मधून बाहेर निघून महामार्गावरून चालत मस्तान नाक्याच्या दिशेने निघाले होते. वैतरणा नदीवरील पुलावर पोहोचले असताना विरुद्ध भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसेल या भीतीने पुलाच्या कैलास पुलाच्या कठड्याला जवळ जाण्याच्या प्रयत्न करीत असताना कठड्यावरून नदीपात्रात पडला, वैतरणा नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने कैलास पाण्याच्या1प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मनोर पोलीस आणि महसूल विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. रात्रीची वेळ असल्याने शोधकार्य सोमवारी सुरू केले जाणार असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली होती. वैतरणा खाडी पात्रा लगतच्या गावांमधील कोतवाल आणि पोलीस पाटलांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू असल्याची माहिती महसूल विभागा कडून देण्यात आली. स्थानिक गावकरी मात्र नदी किनारी भागात शोध घेत होते. वैतरणा नदीला पूर असल्याने शोधकार्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे गावकरी तसेच पोलीस प्रशासन आणि तहसील विभागाकडून सांगण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT