fake doctor pudhari photo
ठाणे

Fake Doctor Arrest: विठ्ठलवाडीत बोगस डॉक्टर जेरबंद

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख डॉ. अनावदीकुमार फकीरचंद राय अशी आहे.

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर: विठ्ठलवाडी पोलिसांनी वैध वैद्यकीय पात्रता नसताना अलोपॅथिक वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख डॉ. अनावदीकुमार फकीरचंद राय अशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. सुषमा शशिकांत देवडे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपी हा चांदसी दवाखान्यात मूळव्याधीवर अलोपॅथिक औषधे लिहून रुग्णांवर उपचार करत होता.

मात्र त्याच्याकडे संबंधित वैद्यकीय पद्धतीत उपचार करण्यासाठी आवश्यक व वैध व्यावसायिक पात्रता नव्हती. ही कारवाई केलेल्या पालिकेच्या पथकात डॉ. सत्यम गुप्ता, डॉ. उत्कर्षा शिंदे, डॉ. रविंद्र भगत आदी पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या दवाखान्यावर छापा टाकला. तपासादरम्यान रुग्णांना औषधे देण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच वैध नोंदणी क्रमांक व अन्य आवश्यक माहिती नसलेली प्रिस्क्रिप्शन आढळून आली.

पोलिस तपासात आरोपीकडे केवळ नॅचरोपॅथी विषयातील डिप्लोमा असल्याचे समोर आले. मात्र तो अलोपॅथीसह इतर वैद्यकीय पद्धतींद्वारे रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तसेच इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

यासंदर्भात उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांनी सांगितले की, शहरात कार्यरत असलेल्या 26 संशयित बोगस डॉक्टरांची यादी महापालिकेकडे उपलब्ध होती. आरोग्य विभागाच्या तपासणीत तीन डॉक्टर एमबीबीएस पात्रताधारक असल्याचे स्पष्ट झाले.

शहरात बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाकडून मोहीम राबवून कारवाई होतेय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT