ठाणे

Thane Dowry Victim | हुंडाबळी..! गर्भवतीच्या हत्येप्रकरणी नवरा, सावत्र मुलाला अटक

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : आचोळे पोलिस ठाणे हद्दीत राहणार्‍या विवाहीतेच्या पतीने व सावत्र मुलाने हुंड्यासाठी गर्भवती असतांना तिच्यासह पोटातील बाळाला औषध देवून ठार मारले. याप्रकरणी नवरा व सावत्र मुलाला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.

असे घडले क्रूर कृत्य

आचोळे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हयात मयत फिर्यादी यांचा आरोपी जयप्रकाश अमरनाथ दुबे हा पती असुन आरोपी सचिन जयप्रकाश दुबे हा सावत्र मुलगा आहे. आरोपी जयप्रकाश दुबे याचे फिर्यादी सोबत लग्न झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी लग्नामध्ये काहीही दिले नाही. या कारणावरुन दारु पिऊन दररोज मारहाण करत होता. 7 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 वाजता आरोपी जयप्रकाश दुबे याने दारु पिऊन फिर्यादी ही 8 महिन्याची गरोदर असताना सुध्दा तिला मारहाण केली व आरोपी सचिन दुबे याने फिर्यादीला पकडुन ठेवुन आरोपी जसप्रकाश दुबे याने कोणते तरी औषध पाजले. त्या औषधाने फिर्यादीच्या पोटातील बाळ पोटामध्येच मयत झाले.

याप्रकरणी 20 एप्रिल 2024 रोजी आचोळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यात पती जयप्रकाश अमरनाथ दुबे याला स्थानिक पोलीसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजुर केला. परंतु आरोपी सचिन दुबे हा पोलीसांना मिळत नव्हता. फिर्यादी ही स्टार हॉस्पीटल, नालासोपारा पश्चिम येथे उपचार घेत असताना 2 जुलै 2024 रोजी मयत झाली. त्यामुळे या गुन्ह्यात खुनाचा कलम वाढण्यात आला.आरोपी जयप्रकाश अमरनाथ दुबे याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीसांनी न्यायालयात अहवाल सादर केला.

न्यायालयाने 11 जुलै 2024 रोजी जामीन रद्द केला. तेव्हापासून दोन्ही आरोपी पळून गेल्यामुळे मिळुन येत नव्हते. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी पोउपनिरी. हितेंद्र विचारे, पोह. राजाराम काळे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, हनुमंत सुर्यवंशी, संग्राम गायकवाड , संतोष मदने, अकिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड हे तपास पथक तयार केले. पथकाने मेहनत घेवुन तपासात सातत्य ठेवून तपास व गोपनीय माहितीचे आधारे सापळा लावण्यात आला. यामध्ये आरोपी जयप्रकाश दुबे (40) व सचिन दुबे (20, रा. विना डायनास्टीक बिल्डींग, एव्हरशाईन, नालासोपारा पूर्व) येथून दोघांना 16 जुलै रोजी अटक केली आहे. दोघांना पुढील कारवाईसाठी आचोळे पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT