ठाणे

Thane | भर पावसाळ्यातही डोंबिवलीकर तहानलेलेच

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथील रिजन्सी अनंतम मधील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील मंजूर पाणी कोटा मिळत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रविवारी राहिवाश्यांनी थेट विकासकाच्या कार्यालयाला धडक देऊन पाण्याची विचारणा केली आहे. ऐन पावसाळ्यात डोंबिवलीकरांना पाणी मिळत नसल्याने करायचं काय? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात दिवसेंदिवस झपाट्याने गृहसंकुलांची काम सुरू आहेत. मात्र या बांधकामांना परवानगी देताना संबंधित यंत्रणांकडून पडताळणी केली जात नाही. त्यामुळे गृहसंकुलांमध्ये वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोर जाव लागत आहे.

नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ

या परिसरात सध्या नागरिकांना विकत पाण्याच्या बाटल्या घेऊन तहान भागविण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन विकासकाच्या कार्यलयाला धडक दिल्याने तातडीने पोलीस आणि उद्योजकाचे खासगी अंगरक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र राहिवाश्यांनी शांततेत आपला रोष उद्योजकाच्या कार्यालयासमोर आपला रोष व्यक्त केला आहे.

SCROLL FOR NEXT