File Photo
ठाणे

डोंबिवली : लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू

कोपर-दिवा स्थानकादरम्यानची घटना

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कामानिमित्त डोंबिवलीहून मुंबईला निघालेल्या एका डोंबिवलीकर तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. लोकलच्या दरवाजात हा तरुण उभा होता. लोकल गर्दीने खचाखच भरलेली असल्याने तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. कोपर ते दिवा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली असून रूपेश गुजर असे मृत तरुणाचे नाव आहे.

डोंबिवली पूर्वेकडील तुकारामनगरमध्ये रूपेश हा कुटुंबासह रहात होता. गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास त्याने डोंबिवली स्थानकातून मुंबईला जाणारी लोकल पकडली. लोकल गर्दीने खचाखच भरलेली असल्याने तो दरवाजात लटकलेल्या अवस्थेत उभा होता. लोकलने वेग पकडताच गर्दीच्या रेट्याने त्याचा हात निसटला आणि तोल जाऊन तो खाली पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT