Water Supply  File Photo
ठाणे

Dombivli Water Supply | डोंबिवलीतील आक्रोश मोर्चाचा इम्पॅक्ट: ३६ तासांच्या शटडाऊननंतर पाणीपुरवठा सुरू

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरातील पाणी टंचाईविरोधात आक्रोश मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

KDMC Water Supply News

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरातील पाणी टंचाईविरोधात काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाचा इम्पॅक्ट आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे. ३६ तासांच्या शटडाऊननंतर यावेळी वेळेआधीच पाणीपुरवठा सुरू झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

बुधवारी एमआयडीसी कार्यालयावर धडकलेल्या आक्रोश मोर्चानंतर एमआयडीसी प्रशासनाने गुरूवारी रहिवासी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून ३६ तासांचा शटडाऊन २४ अधिक १२ तास असा विभागून घेणे, अनधिकृत नळजोडण्या आणि पाणी चोरीवर एमआयडीसी, पोलिस आणि केडीएमसीच्या संयुक्त भरारी पथकामार्फत कारवाई करणे, मिलापनगर तलावातील पाणी फिल्टर करून दुय्यम वापरासाठी देणे आणि अटी शर्तीवर बोअरवेलला परवानगी देणे, तसेच घरडा सर्कल येथील नवीन जलकुंभाचे काम लवकर पूर्ण करणे असे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले होते.

या साऱ्याचा परिणाम म्हणून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत असलेला ३६ तासांचा शटडाऊन पाणीपुरवठा बंद नेहमीप्रमाणे सायंकाळपर्यंत सुरू होईल असे वाटत असताना दुपारी एक वाजताच पाणी आल्याचा अनुभव रहिवाशांना आला. बहुतेक जनतेचा आक्रोश मोर्चा एमआयडीसीच्या कार्यालयावर आदळल्यानंतर प्रशासनावर दबाव आला आणि त्यांनी हे धोरण बदलले असावे. शटडाऊननंतर वेळेत पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे, ही रहिवाशांची मागणी मान्य केल्याची प्रतिक्रिया या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. आक्रोश मोर्चाचा हा पहिला सकारात्मक परिणाम मानला जात असल्याचे मत नलावडे यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT