Dombivli Crime | दिवसा मिस्त्री काम...अन् रात्री दुचाक्यांच्या चोऱ्या, पतीचे कारनामे ऐकून पत्नीही चक्रावली!  
ठाणे

Dombivli Crime | दिवसा मिस्त्री काम...अन् रात्री दुचाक्यांच्या चोऱ्या, पतीचे कारनामे ऐकून पत्नीही चक्रावली!

कल्याणच्या एमएफसी पोलिसांनी ठोकल्या सराईत चोरट्याला बेड्या

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मिस्त्रीचे काम करून पैसे कमावितो. परंतू नशेखोरीसाठी पैसा कमी पडतो. त्यासाठी त्याने दुचाक्या चोऱ्या सुरू केल्या. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी ललित देवरे या ३३ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या पतीच्या कारनाम्यांनी पत्नीही चक्रावली आहे. आरोपी ललित देवरे याने आत्तापर्यंत चोरलेल्या चार दुचाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहे.

    कल्याणसह आसपासच्या परिसरात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने पोलिसांचे पथक या चोरट्यांच्या शोधासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनखाली महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळकृष्ण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी विकास मडके आणि त्यांचे सहकारी वाहन चोरांच्या शोधात होते.

पोलिस अधिकारी मडके यांना खासगी गुप्तरांकडून उपयुक्त महिती मिळाली होती. कल्याणमध्ये चोऱ्या करणारा बदमाश नाशिकजवळील सिन्नर परिसरात राहणारा असल्याचे समोर आले. मिळालेल्या पत्त्यानुसार पोलिस अधिकारी मडके आपल्या शोध पथकासह त्या पत्त्यावर पोहोचले. सदर ठिकाणाहून ललित देवरे याला पोलिसांनी ताब्यत घेतले. चौकशी दरम्यान कल्याणमधून दुचाक्या चोरणारा ललित देवरे हाच असल्याची खात्री पटली.

मेस्त्री काम करणारा आपला पती दुचाक्यांच्या चोऱ्या करतो, हे ऐकून पत्नी देखिल चक्रावून गेली होती. पोलिसांनी ललितकडून आतापर्यंत चार दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. एक दुचाकी त्याने जळगाव येथे विकली होती. ललित हा मिस्त्रीचे काम करतो. नशा करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यासाठी त्याने दुचाक्या चोरण्याचा सपाटा लावला होता. मात्र पोलिसांनी त्याचे कारनामे चव्हाट्यावर आणले आहेत. आत्तापर्यंत त्याने किती चोऱ्या केल्या ? याचा पोलिस चौकस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT