कांदिवली (ठाणे ) : मुंबईचे डबेवाले बुधवार दिनांक ९ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत. 9 ते 14 एप्रिलपर्यंत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत.
15 एप्रिलपासून ते पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यांतील आपल्या गावी दरवर्षी जातात.
ग्रामदैवत आणि कुलदैवतांच्या मुंबईचे डबेवाले आपल्या कुटुंबासोबत यात्रांत सहभागी होतात. यंदाही ते सहा दिवस या सुटीवर आहेत. त्यात महावीर जयंती, हनुमान जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती या सुट्ट्याही असल्याने डबेवाल्यांची सुट्टी प्रत्यक्षात दोन दिवसांचीच आहे. ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंतीही तळेकर यांनी केली आहे.