देसाई-निळजे-काटई उड्डाणपुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला मंजुरी file photo
ठाणे

Desai Nilje Katai bridge inspection : देसाई-निळजे-काटई उड्डाणपुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला मंजुरी

मनसेचे नेते प्रमोद पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर ऑडिटला मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : कल्याण शीळ रस्त्यावरील देसाई निळजे काटई (पलावा ) उड्डाणपूल लोकार्पणानंतर चर्चेत आला होता. लोकार्पणाच्या काही वेळातच उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरु झाल्याने तो वाहतुकीस्तही बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी मनसेचे नेते राजू पाटील व ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुक्ष दीपेश म्हात्रे यांनी प्रत्यक्ष केली होती. तर उड्डाणपुलाच्या स्टक्चरल ऑडिटची मागणी व्हीजेटीआय मार्फत केली होती. त्यानंतर आता खड्डेमय झालेल्या उड्डाणपुलाच्या स्टक्चरल ऑडिटला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.

कल्याण शीळ रस्त्यावरील अर्धवट पलावा उड्डाणपूल शिवसेनेनं वाहतुकीसाठी खुला केला होता. या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या अनेक डेडलाईन सत्ताधार्‍यांनी दिलेल्या होत्या. मात्र वेळेत काम पूर्ण झाला नसल्याने या उड्डाणपुलावर मनसे सह ठाकरेंची शिवसेना एकत्र आली होती. या निरीक्षणाच्या आधारावर 3 जून रोजी मुख्यमंत्र्यांना मनसेचे नेते राजू पाटील यांनी निवेदन देत शासनाच्या व्हीजेटीआय संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे.

मंगळवारी ता. 5 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आदेश काढून व्हीजेटीआय या संस्थेमार्फत ऑडिट करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात अहवाल सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. सदर पुल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर त्यावर एका महिन्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जे कामाच्या गंभीर हलगर्जीपणाचे व निकृष्ट दर्जाचे प्रतिक झालं आहे.

अशा परिस्थितीत राजू पाटील यांनी वेळेवर घेतलेली तांत्रिक आणि सार्वजनिक दृष्ट्या सजग भूमिका योग्य वाहनचालकांच्या दृष्टीने महत्वाची मागणी केली होती. पाटील यांनी याआधी देखील कल्याण-शिळ रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत हरकत घेतली होती. या रस्त्याची गुणवत्ता देखील व्हीजेटीआय मार्फत तपासण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT