Ramesh Mhatre  
ठाणे

Ramesh Mhatre Disqualification | रमेश म्हात्रेच्या नगरसेवक पदावर अपात्रतेची कारवाई तात्काळ करा

केडीएमसी आयुक्तांना दुसऱ्यांदा स्मरणपत्र, पुरावे देऊन ६ महिने उलटले... तरी कारवाई शून्य

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानग-रपालिकेमधील ३ नगरसेवकांसह वादग्रस्त रमेश सुकऱ्या म्हात्रे (७३) यांच्या नगरसेवक पदावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत पुराव्यांसह तक्रार देऊन ६ महिने उलटून गेले तरी प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. राजकीय दबावापोटी कारवाई लांबविली जात असल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदार जोशी यांनी खळबळ उडवून दिली आहे. अंबरनाथ परिसरात राहणारे कल्पेश जोशी यांनी या संदर्भात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना दुसऱ्यांदा स्मरणपत्र देऊन पुन्हा एकदा तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

नगरसेवक पद रद्द करण्याचे अधिकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेलाच असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने तक्रारदार कल्पेश जोशी यांना पत्राद्वारे कळविले आहे. नगरसेवक पद रद्द करण्याची कार्यवाही आयोगाकडून करण्यात येत नाही. हे सर्वाधिकार संबंधित आयुक्त आणि नगर विकास विभागाला असल्याचेही आयोगाने कळविले आहे. यासंदर्भात आयोगाने केडीएमसी देखील तसे कळविले आहे.

या संदर्भात होणाऱ्या कार्यवाहीसाठी नगरविकास विभागाशी संपर्क साधू शकता, असे राज्य निवडणूक आयोगाने तक्रारदार कल्पेश जोशी यांना पत्राद्वारे कळविले आहे. स्मरणपत्रात जोशी यांनी म्हटले आहे की, प्रतिज्ञापत्रातील माहिती खोटी आढळल्यास माझ्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा. अन्यथा संबंधित नगरसेवकांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी.

रमेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारी अर्जात सत्यप्रतिज्ञा पत्राच्या माध्यमातून अनधिकृत बांधकाम केलेले नाही. आपल्या रक्ताच्या नात्यामधील कुणीही अनधिकृत बांधकाम केले नसल्याचे म्हटले आहे. म्हात्रे यांनी दिलेली माहिती खोटी आहे. म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण याने जुनी डोंबिवली परिसरात सहकाऱ्यांच्या मदतीने बेकायदा इमारत उभारली आहे.

या इमारतीच्या जमिनीची बनावट कागदपत्रे, सात/बारा, फेरफार तयार करून त्यामध्ये त्या जमिनीशी कोणताही संबंध नसताना स्वतःचे नाव घुसडले आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी प्रवीण फरार झाला आहे. मुलाच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणा-वरून रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करा, अशी मागणी तक्रारदार कल्पेश जोशी हे गेल्या सात महिन्यांपासून केडीएमसी आयुक्त, नगरविकास प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगाकडे करत आहेत. या यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही आपल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जात नाही म्हणून तक्रारदार जोशी यांनी मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले.

आयुक्तांच्या कारवाईकडे नजरा

या संपूर्ण प्रकारामुळे केडीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुरावा असूनही कारवाई न होणे म्हणजे प्रशासनाची उदासीनता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आता आयुक्त अभिनव गोयल या स्मरणपत्रावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना शिवीगाळ करून त्यांना बेदम मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचे कोपर प्रभागाचे नगरसेवक पद रद्द करा, या मागणीसाठी तक्रारदार कल्पेश जोशी यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राचा दाखला देत दुसरे स्मरणपत्र दिले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे तपास यंत्रणा रमेश म्हात्रे यांची माहिती मिळविण्याच्या कामाला लागल्या आहेत. अशा परिस्थितीत म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी सर्व स्तरातून दबाव वाढत आहे.

निवडणूक आयोगाचा चेंडू

केडीएमसीत कल्पेश जोशी यांनी २१ जानेवारी रोजी केडीएमसीच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्यासह शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेविकांविरोधात अपात्रतेची तक्रार पुराव्यांसह दाखल केली होती. त्यानंतर २३ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगानेही स्पष्ट केले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ झ) नुसार नगरसेवकांना अनर्ह ठरविण्याची कार्यवाही संबंधित महानगरपालिका किंवा नगरविकास विभागामार्फतच होणे आवश्यक आहे. त्यानुसार आयोगाने तक्रारीची प्रत केडीएमसीला पाठवली आहे. मात्र एवढे होऊनही आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने कल्पेश जोशी यांनी २८ जुलै रोजी आयुक्त अभिनव गोयल यांना स्मरणपत्र दिले आहे. त्यात त्यांनी तक्रारीसोबत दिलेले सर्व पुरावे आणि

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT