ठाणे : बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिरच्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा बदलापूर पोलिसांनी सोमवारी मुंब्रा बायपास रोडवरच एन्काऊंटर केल्याने या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. (Akshay Shinde Encounter)
माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या आरोपीची बाजू घेणे दुर्दैवी आहे. बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या, असे विरोधकच म्हणत होते आणि आता पायाखालची जमीन सरकली म्हणून ते आरोप करत आहेत. पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी जी कारवाई केली त्याचा निश्चित तपास होईल, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे.
ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाकडे आरोपी अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार पोलीस पथक तळोजा कारागृहात धडकले आणि आरोपी अक्षय शिंदे याला घेऊन ठाण्याकडे निघाले होते. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मुंब्रा बायपास टोलनाक्याच्या आसपास आरोपी अक्षय शिंदे याने अकस्मात सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांचे पिस्तूल हिसकावले आणि त्यांच्या दिशेने तीन राउंड फायर केले. दोन फायर हवेत झाडले, तर एक गोळी मोरे यांच्या पायावर लागली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी बरोबर अक्षयच्या डोक्याला लागली, तर दुसरी अन्यत्र लागली, त्याला कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अक्षयने झाडलेली गोळी मात्र एपीआय नीलेश मोरेंच्या पायाला लागली. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आधी अक्षयने जीवन प्रवास थांबवल्याची बातमी पसरली. पाठोपाठ है पोलिसांचेच एन्काऊंटर असल्याचे सांगितले जावू लागले. आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. ता आत्मरक्षणाच्या नावाखाली केलेला एन्काऊंटर आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. मृत अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनीही पोलिसांवर गंभीर आरोप करीत आमच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे महटले आहे
• तळोजा कारागृहातून ठाण्याकडे नेण्यात येत असताना मुंब्रा बायपासवर आरोपी अक्षय शिंदेने एपीआय नीलेश मोरेंचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचले
• नीलेश मोरे यांच्यावर त्याने ३ गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी नीलेश मोरेंच्या पायाला लागली. दोन गोळ्या झाडताना त्याचा नेम चुकला.
• या धांदलीत सोबतच्या पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय ठार झाला.
विरोधक आता या प्रकरणातही आरोप करू लागले आहेत. प्रश्न उपस्थित करत आहेत. ते प्रत्येक बाबतीत प्रश्नच उपस्थित करतात. कालपर्यंत हेच विरोधक अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होते. आता त्यानेच पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलीस आपले रक्षण करणारच, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
अक्षय शिंदे याच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलिसांचे पथक सोमवारी सायंकाळी ५-३० वाजण्याच्या सुमारास तळोजा रुग्णालयात पोहोचले. तत्पूर्वी ५ वाजण्याच्या सुमारास अक्षय शिंदे याला त्याचे वडील भेटून गेलेले होते. ५-३० वाजता गुन्हे शाखा पोलीस अक्षय शिंदे यांनी त्याचा ताबा घेतला. ठाण्याकडे येताना मुंब्रा बायपासवर हा सनसनाटी प्रकार घडला
अक्षय शिदे यांच्या पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूनंतर बदलापुरात पाटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी शिरगाव येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले. चिमूरडयांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकरांच्या मनात असंतोष खदखदत होता. आरोपीला तातडीने फाशी देण्याच्या मागणीसाती बदलापूरकर रस्त्यावर आणि रेल्वे रोडवर उतरले होते. आरोपीला फाशी देण्याचे मागणी करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या सरकारचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे अविनाश मोरे यांनी सांगितले, चिमुरडयांकर झालेल्या अत्याचारानंतर झालेल्या कार घेणाऱ्या महिला आंदोलकांनी एकमेकींना पेढे भरुन जल्लोष केला नराधम अक्षय शिंदेचा असा मृत्यू झाल्याने आम्ही आत्यंत समाधानी असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रियांका दामले यांनी सांगितले.
चोवीस वर्षीय अक्षय हा शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता.
शाळेत स्वच्छता ठेवण्याचरोबर मुलांना वॉशरूमला घेऊन जाण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते.
मुले अक्षयला काठीवाला दादा म्हणून ओळखायची.
अक्षयला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुरावण्यात आली होती.
अक्षय शिंदे याच्या संशयास्पद एन्काऊंटरची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिस उपायुक्त, पराग मनेरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षयने स्वतःवर गोळी झाडली की आणखी काही दसरे आहे? त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही आहे? याची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएसपर्यंत गेले आहेत, या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार तर नाही ना? याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे. आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बदलापूर येथील शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांनी उच्य न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेची न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या एकल खंडपीठाने याचिकेची सुनावणी १ ऑक्टोंबरला निश्चित केली आहे. बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील चार वर्षाच्या दोया चिमुरड्यांवर शाळेण्या आवारातच शालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत सर्वच स्तरातून यावर संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. मात्र गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून (स्वतः) दखल घेत या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.