भाजप आमदार गणपत गायकवाड.  (File Photo)
ठाणे

Ganpat Gaikwad Firing Case | माजी भाजप आमदार गणपत गायकवाड यांची डोकेदुखी वाढली; हायकोर्टात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल

आरोपींना जामीन देण्यास न्यायालयाने नकार नुकताच दिला होता नकार

पुढारी वृत्तसेवा

Ganpat Gaikwad Firing on Mahesh Gaikwad

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने जमीन नाकारलेले भाजपाचे माजी आमदार गणपत गायकवाड यांची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्यावरील हल्ला प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. महेश गायकवाड यांनी याचिकेत म्हटलं आहे कि, राजकीय वैमनस्यातून पोलिस तपासात त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे कल्याण पूर्वेचे लक्ष लागले आहे. माजी आमदार गायकवाड यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने नुकताच फेटाळला आहे. त्यामुळे महेश गायकवाड यांच्या नवीन याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण पूर्वेतील भाजपचे माजी आमदार गणपत काळू गायकवाड यांच्याशी संबंधित प्रकरणात " तपास योग्य प्रकारे झाला नाही " असा दावा करून, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने उल्हासनगरमधील तपास अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. आणि त्यांना त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालय या प्रकरणी २५ ऑगस्ट रोजी महेश गायकवाड यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

वकील अभिषेक कुलकर्णी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, घटनेच्या वेळी आमदार असलेले मुख्य आरोपी गणपत गायकवाड यांनी राजकीय वैमनस्यातून महेश यांच्या हत्येचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. हा कथित हल्ला वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला होता."म्हणून, या प्रकरणात, तपास योग्य रित्या पार पडला नाही. गुन्हे शाखेने हल्ला आणि खुनाच्या प्रयत्नाचा योग्य तपास केलेला नाही, त्या सर्व संबंधित दृष्टिकोनांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहे. " असे याचिकेत म्हटले आहे. याचिकेत गणपत गायकवाड आणि त्याच्या सह-आरोपींविरुद्ध कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि ३२४ (धोकादायक शस्त्रांनी स्वेच्छेने दुखापत करणे) लागू करण्यात आलेली नाही यावरही देखील आक्षेप घेण्यात आला आहे.

त्यात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की , सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आणि गणपत यांचा मुलगा वैभव गायकवाड याला पोलीस तपासात क्लीन चिट देण्यात आली आहे. महेश यांचा गणपत गायकवाड यांच्याशी जुना राजकीय संघर्ष असल्याचा दावा आहे आणि ते म्हणतात की २५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली होती. २९ ऑगस्ट २०२० रोजी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून तक्रार मिळाल्याची कबुली देणारा संदेश मिळाला होता. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गाव येथे जमिनीच्या वादावरून तणाव वाढला होता.

महेश गायकवाड यांच्या मते २ फेब्रुवारी २०१४ रोजी, निरीक्षक जगताप यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून सांगितले की , वैभव आणि आणखी एका व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. स्टेशनवर वैभव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महेश यांना शाब्दिक शिवीगाळ केली. जगताप यांनी गणपत आणि महेश यांच्या समर्थकांना केबिनमधून बाहेर पडण्यास सांगितले तेव्हा बाहेर गोंधळ उडाला आणि परिस्थिती शांत करण्यासाठी जगताप यांना तेथून जावे लागले. गोंधळात, गणपत गायकवाड यांनी कथितपणे आपली बंदूक काढली आणि महेश आणि त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. महेशला वाचवण्यासाठी जगताप पुन्हा केबिनमध्ये धावले, परंतु गणपत गायकवाड यांचे समर्थकही वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिन मध्ये घुसले आणि गोळीबार सुरूच ठेवला होता.

५ ऑगस्ट रोजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने गणपत गायकवाड आणि त्याच्या काही साथीदारांना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता महेश गायकवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर कल्याण पूर्वेत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आत न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र महेश गायकवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर माजी आमदार महेश गायकवाड यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT