कल्याण : राज्यभरात आगामी पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप पक्षातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे व त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे या म्हात्रे दांपत्याने भाजपला सोड चिठ्ठी दिली. यामुळे आगामी पालिका निवडणुकीपूर्वीच भाजपाला खिंडार पडले आहे.
म्हात्रे येत्या काही दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. काही दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आगामी निवडणुकीपूर्वी भाजपा, शिवसेना शिंदे गट, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षातही मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होऊन पक्ष फोडाफोडी होणार असल्याने या निमित्ताने दिसून येत आहे.