ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क | अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष आणि भाजपा नेत्या पूर्णिमा कबरे यांचे मंगळवार (दि.24) रोजी अल्पशा आजाराने पहाटे निधन झाले.
भाजपा नेत्या आणि माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे संचलित कमलधाम वृद्धाश्रम सुरु आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या पुर्णिमा कबरे यांनी माजी नगराध्यक्ष म्हणून १९९५-२०२० या वाटचालीत नगरसेविका आणि नगराध्यक्ष म्हणून काम केले. १९९८-९९ सालची एक वर्षाची कारकिर्द महाराष्ट्रातील शेकडो नगराध्यक्षांना नगराध्यक्षपदाची अडीच वर्षांची सत्तेची ही संधी देणारी ठरली. अंबरनाथमध्ये घेतला गेलेला राजकीय इतिहासातील हा निर्णय एक मैलाचा दगड ठरला आहे. त्याचप्रमाणे शिवाजी नगर पोलिस ठाणे, वडवली गावदेवी मैदान या वस्तूही त्यांच्या काळातच मूर्त स्वरूपात आल्या आहेत. या योगदानाबद्दल त्यांना 2025 जागतिक महिला दिनानिमित्त लोकसेविका पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले होते.