भिवंडी : पुढारी वृत्तसेवा
भिवंडी पालिकेच्या अमृत २.० या योजनेत मंजूर झालेल्या १०० एम एल टी पाणीपुरवठा योजनेसाठी मुंबई महानगर पालिकेने पिसे येथील १२ एकर जमीन ३० वर्षांच्या भाडेतत्वावर देण्यास बुधवारी पार पडलेल्या मुंबई महासभेने मान्यता दिल्याने भिवंडी पालिकेच्या १०० एम एल टी पाणीपु रवठा योजनेचे काम मार्गी लागून जलद गतीने काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास या आमदार रईस शेख यांनी व्यक्त केला आहे.
लोकसंख्या १२ भिवंडीची लाखावर गेली असून या शहराची पाण्याची मागणी १६२ दशलक्ष लिटर इतकी झाली आहे. मात्र सध्या केवळ
प्रतिदिन १०२ दशलक्ष लिटर इतकाच शहराला पाणीपुरवठा होतो. भिवंडी पालिकेला भातसा धरणातून बंद पाई-पलाईनद्वारे पाणी योजना केंद्र सरकारच्या अमृत २.० अंतर्गत मंजूर झालेली आहे. मात्र या योजनेमधील पिसे येथे उभारले जाणारे उदंचन केंद्रे, जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्रे आणि पाईपलाईन यासाठी आवश्यक असणारी जागा बृहन्मुंबई महानगरपा-लिकेच्या मालकीची आहे. या योजनेसाठी जागा भिवंडी पालिकेला ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने द्यावी यासाठी प्रयत्न सुरू होते, त्यासाठी प्रस्ताव पालिकेकडे पाठवला होता. बुधवारी महानगरपालिकेच्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.