Bhiwandi Fake Ghee Pudhari
ठाणे

Bhiwandi Fake Ghee: भिवंडीत नकली तुपाचा धंदा पुन्हा जोरात; कारवाईनंतरही कारखाने सुरूच!

सध्या बाजारात आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या अनेक पदार्थांची भेसळ करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह काही भागात जनारावरांच्या चरबीपासून नकली तूप बनवण्याचा कारखाना स्थानिक महापालिका प्रशासनाने छापा टाकून उद्ध्व‌स्त केल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.

मात्र, स्थानिक प्रशासनाच्या कारवाईनंतर हेच नकली तूप बनवण्याचे कारखाने नवीन जागेत जैसे थे सुरू होत असल्याचे आढळून आले आहे. या कारखान्यात बनवण्यात येणारे नकली तूप ग्रामीण भागातील दुकानांवर तसेच उपहारगृह, खानावळ यांना पुरवण्यात येते. त्यामुळे रस्त्यावरची उपहारगृह, अनधिकृत खानावळींमध्ये बनणारे पदार्थ आणि ग्रामीण भागात विक्री होणाऱ्या तुपाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या बाजारात आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या अनेक पदार्थांची भेसळ करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या भेसळयुक्त पदार्थांमुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान तर होतेच, मात्र सगळ्यात जास्त भीती असते ती म्हणजे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची.

स्थानिक प्रशासन व अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेळोवेळी अशाप्रकारच्या भेसळयुक्त वस्तूंवर, गोदामांवर कारवाई करत भेसळ करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण, याला न जुमानता अनेक व्यापारी, दुकानदार बिनदिक्कतपणे भेसळ करतात.

मागील वर्षी भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना महापालिका पथकाने उद्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त केले होते. खाडीकिनारी असलेल्या एका कारखान्यात जनावरांची चरबी वितळवून त्यापासून बनावट तूप बनवले जात होते.

घटनास्थळवर तूप बनविण्याच्या भट्टीवरील कढई, बनावट तुपाचे डब्बे, जनावरांची चरबी असे साहित्य जप्त करण्यात येऊन या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. हे नकली तूप छोट्या मोठ्या खानावळी, उपहारगृह व हॉटेल व्यवसायीक तसेच ग्रामीण भागात विक्री होत असल्याचे या करवाईतून उघड झाले होते.

या प्रकरणी भिवंडीतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. मात्र असे नकली तूप बनवणारे कारखाने पुन्हा नव्या जागेत जैसे थे सुरू होत असल्याचे देखील अनेकवेळा समोर आले आहे. तर दुसरीकडे स्वस्त व नकली तुपामुळे नागरिकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अधिकृत विक्रत्यांकडूनच तूप खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, नकली तूप खाण्यामुळे अनेक शारीरिक व्याधी होऊ शकतात असे डॉक्टर व आहार तज्ज्ञ सांगतात. भेसळयुक्त अथवा नकली तूप खाल्याने पोटाचे विकार होऊ शकतात असा इशारा आहारतज्ज्ञ देतात.

असली-नकली कसे ओळखावे

शुद्ध तूप तपासण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ते हातावर घेऊन तपासणे. तुमच्या तळहातावर एक चमचा तूप घ्या आणि ते वितळेपर्यंत काही वेळ थांबा. तूप वितळायला लागले तर शुद्ध आहे, तसेच राहिले तर भेसळयुक्त आहे, असे ओळखावे. गॅसवर पॅनमध्ये एक चमचा तूप गरम केल्यावर जर तूप लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंगाचे झाले तर ते शुद्ध तूप आहे. जर ते वितळण्यास वेळ लागला आणि फिकट पिवळे झाले तर ते भेसळयुक्त आहे असे ओळखावे.

असे बनते नकली तूप

एक किलो नकली तूप बनवण्यासाठी ५०० ग्रॅम जनावरांची चरबी, ३०० ग्रॅम रिफाईंड ऑइल, २०० ग्रॅम असली तूप आदी पदार्थ एकत्र करून त्यास मोठ्या कढईत गरम करण्यात येते. त्यानंतर या तुपात शुद्ध तुपासारखे सुगंध देणारे एसेंस केमिकल मिसळून डब्यात पॅक केले जाते. त्यानंतर हे डब्बे विक्रीसाठी पाठवले जातात, अशी माहिती अन्न व औषध विभागाच्या सूत्रांनी दिली. रस्त्यावरचे उपहारगृह, स्वस्त हॉटेल्स आदी ठिकाणी अशा तुपापासून बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवली जातात. तर ग्रामीण भागात देखील अशा नकली तुपाची विक्री केली जाते.

अशी करा तक्रार

कुठेही भेसळयुक्त पदार्थ विक्री होत असेल तर त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनविभागाकडे अथवा स्थानिक महापालिका प्रशासनांकडे करता येते. एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर अथवा इमेलने देखील भेसळयुक्त पदार्थांची तक्रार करता येते.

“मान्सूनच्या काळात नागरिकांची सुरक्षा ही आमची सर्वांत पहिली प्राथमिकता आहे. अति-जर्जर इमारतींविरोधात प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ३४ धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर पाडकामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उर्वरित जर्जर इमारतींवरही कोणतीही दिरंगाई न करता कठोर कारवाई केली जाईल. मात्र, प्रभावित नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत सध्या महापालिकेकडे ठोस योजना उपलब्ध नाही.”
- दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त (अतिक्रमण), वसई-विरार महापालिका.
“अवैध इमारती उभ्या राहत असताना प्रशासनाने कारवाई केली नाही. आता बांधकाम झाल्यानंतर वर्षानुवर्षांनी घर खाली करण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. पालिका घर खाली करून पाडणार असेल, तर बेघर होणाऱ्या कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची जबाबदारीही प्रशासनाने घ्यावी.”
- राहुल सिंह, समाजसेवक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT