Bhiwandi Drowning Incident pudhari photo
ठाणे

Bhiwandi Drowning Incident : भिवंडीतील भादवड तलावात दोन अल्पवयीन मुले बुडाली

एकाचा दुर्दैवी मृत्यू, तर दुसऱ्याला वाचवण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : संजय भोईर

भिवंडी शहरातील भादवड परिसरातील तलावात दोन मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.

आयुष मौर्या आणि त्याचा मित्र अनिकेत हे दोघे भादवड गावातील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते दोघे तलावात बुडाले. दरम्यान यापैकी अनिकेतला वाचवण्यात एका नागरिकाला यश आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे, तर आयुषचा मात्र पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात शोककळा पसरली आहे.

भिवंडीतील भादवड परिसरातील योगीधाम सोसायटीमध्ये राहणारे १२ वर्षीय आयुष मौर्या आणि त्याचा मित्र अनिकेत हे अन्य एका मित्रासोबत भादवड येथील तलावाजवळ गेले होते. यावेळी दोघेही तलावात उतरले; मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.

हा प्रकार पाहून तिसऱ्या मित्राने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर एका नागरिकाने प्रसंगावधान राखत अनिकेतला पाण्याबाहेर काढून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आयुष मौर्याला वाचवण्यात यश आले नाही आणि त्याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल आणि शांतिनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आयुष याचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, मुलगा तलावात बुडतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या घटनेमुळे मौर्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT