Girl Molestation file photo
ठाणे

Thane Crime: लग्नाचे आमिष दाखवून डान्स शिक्षिकेवर अत्याचार

३० वर्षीय डान्स क्लास शिक्षिकेची नवघर पोलीस ठाण्यात तक्रार; आरोपीविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय डान्स क्लास शिक्षिकेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तौफिक रसिद खान , वय २६ वर्ष, व्यवसाय - केक शॉप, रा. ओम आनंद बिल्डींग, क्रॉस गार्डन, भाईंदर पश्चिम असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला भाईंदर पूर्व येथे राहत असून डान्स क्लास शिक्षिका आहे.

सप्टेंबर २०२४ पासून ते आतापर्यंत आरोपी तौफिक खान याने पीडितेच्या राहत्या घरी वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याशिवाय, व्यवसायाचे कारण सांगून त्याने पीडितेकडून ९ लाख रुपये रोख आणि सुमारे २ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा ऐवज घेतला व तो परत न करता तिची आर्थिक फसवणूक केली.

पीडितेने जाब विचारला असता तिला शिवीगाळ करत मारहाण करून धमकावण्यात आले. या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तौफिक रसिद खान याच्याविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT