Bhayandar Narcotics Case Pudhari
ठाणे

Bhayandar Narcotics Case: भाईंदरमध्ये एम.डी., ब्राऊन शुगरसह दोघांना अटक; १ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली.

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: भाईंदर पूर्व परिसरातील कॉलेज जवळ नवघर पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १ लाख ३८ हजार रुपये किमतीचे एम. डी. (मेफेड्रॉन) आणि ब्राऊन शुगर (गर्दा) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे सव्वादहा वाजता कॉलेज परिसरातील इमारतीसमोरील खाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तुषार खोमणे, (वय-३१) रा. भाईंदर पूर्व याच्या अंगझडतीत सुमारे १८,६०० रुपये किमतीचा ६.२ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ मिळून आला. तर रोहित थापा, (वय २४) भाईंदर पश्चिम याच्या ताब्यातून सुमारे १,२०,००० रुपये किमतीचा ६.२ ग्रॅम ब्राऊन शुगर (गर्द) हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दोघांकडून एकूण १ लाख ३८ हजार ६०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT