भोईर यांनी समितीच्या सदस्यांना आम्हाला त्रास देईल त्यांचा विकेट पाडू अशी धमकी माध्यमांच्या कॅमेर्‍यांसमोरच दिली आहे. pudhari news network
ठाणे

Bharat Bhoir in Kalyan : आम्हाला त्रास देईल त्यांची विकेट पाडू ; रस्त्याच्या कामावरून राडा

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : कल्याण ग्रामीण मधील 14 गावांचा नुकताच नवी मुंबई महापालिकेत समावेश झाला आहे. त्या 14 गावांचा विषय चर्चेत असताना 14 गावातील एका रस्त्याच्या कामावरून राडा झाला आहे. शुक्रवारी (दि.13) 14 गाव विकास समिती आणि शिंदेचे उप जिल्हा प्रमुख भरत भोईर यांच्यात मोठा वाद झाला होता. यावेळी भोईर यांनी समितीच्या सदस्यांना आम्हाला त्रास देईल त्यांचा विकेट पाडू अशी धमकी माध्यमांच्या कॅमेर्‍यांसमोरच दिली आहे. यानंतर समितीने शिळ-डायघर पोलीस ठाणे गाठले आहे.

दहिसर वालीलकर पाडा या मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा निधी अन्यत्र वापरल्याचा आरोप 14 गाव सर्वं पक्षीय विकास समितीने केला आहे. या रस्त्याच्या कामाची शुक्रवारी पाहणी केली. यावेळी शिंदेचे उप जिल्हाप्रमुख भरत कृष्णा भोईर आपल्या साथीदारांसह त्या वादग्रस्त रस्त्यावर पोहोचले आणि सर्वं पक्षीय विकास समिती पदाधिकार्‍यांसोबत वाद करत आम्हाला त्रास दिला तर विकेट पाडू अशी धमकीच दिली आणि तिथेच राडा केला आहे. तसेच भरत कृष्णा भोईर यांच्या साथीदारांनी माध्यमांना कॅमेरा बंद करायला सांगत दमदाटी सुद्धा केली आहे. त्यामुळे नव्याने नवी मुंबईत गेलेल्या 14 गावात वातावरण तापल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील दहिसर वालीलकर पाडा या रस्त्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र मंजूर झालेला निधी तिथे न वापरता शिंदेचे उप जिल्हाप्रमुख भरत भोईर यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी संगनमत करून दुसरीकडे वापरून रस्ता तयार केला, ज्या ठिकाणी रस्ता केला त्या ठिकाणी भोईर यांच्या मालिकेचे गोडाऊन आहेत, असे 14 गाव सर्वं पक्षीय विकास समितीच्या सदस्यांनी सांगितले. तर भरत भोईर यांनी रस्ता योग्य ठिकाणी केल्याचे सांगितले आहे.

रस्त्याची चौकशी व्हावी

समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील याविषयी म्हणाले, निधी मंजूर झालेला व भूमिपूजन केलेला रस्ता हा वेगळा असून कंत्राटदाराने वेगळ्याच ठिकाणी काम केले आहे. कंत्राटदार व भरत कृष्णा भोईर यांच्या संगनमताने हे झालेले आहे. या रस्त्याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. पीडब्ल्यूडीचे मंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांच्या निधीतून जे काम दिलेल आहे. 35 कोटीचे, त्यातीलच 88 लाखाचं हे काम आहे. ते गावात काम न करता येथील जी गोदाम परिसर आहे तिकडे काम करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी भरत काळू भोईर म्हणाले, 88 लाखाचा निधी हा दहिसर मोरी साठी आलेला होता. मात्र येथील उपजिल्हाप्रमुख भोईर यांनी या कंत्राटदारावर दबाव आणून त्यांनी हा रस्ता त्यांच्या गोदामासाठी करून घेतला आहे. याची चौकशी व्हावी यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्रव्यवहार केला असून आमच्या पक्षातील वरिष्ठांना देखील पक्षाची बदनामी होत असल्याचे कळविले आहे. त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे अशी माझी मागणी आहे असे ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT