महिलांनी "8. 11 बदलापूरची राणी" डब्यासमोर स्टेशनवर गरब्याचा फेर धरला  pudhari
ठाणे

Badlapur | बदलापुरात एक दिवस आधीच रेल्वे प्रवाशांचा दसरा उत्साहात

पुढारी वृत्तसेवा
पंकज साताळकर

बदलापूर : दसऱ्याच्या एक दिवस आधीच बदलापुरातील रेल्वे प्रवाशांनी जोरदारपणे दसरा साजरा केला. प्रवाशांमध्ये उत्साह आणि जल्लोष दिसून आला. बदलापूर रेल्वे स्थानकात विविध ट्रेनमध्ये प्रवाशांनी ट्रेन सजवणे, तिची पूजा करणे तसेच डब्यांमध्ये आरती आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तर महिलांनी हळदीकुंकू, आपट्याची पाने वाटप केले. तसेच 8. 11 बदलापूरची राणी या मुंबईकडे सीएसटी कडे जाणाऱ्या महिला डब्यासमोर महिला प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर गरब्याचा फेर धरत दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला.

प्रवाशांनी दसरा साजरा करण्यासाठी अनेक जण हे नटून-थटून तसेच हार फुलं घेऊनच रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. गेल्या वर्षभर जे रेल्वे प्रवासी सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांचाही यावेळेस सत्कार करण्यात आला. तसेच रेल्वेचे मोटरमन गार्ड यासह रेल्वेचा लाईनमन स्टाफ रेल्वे अधिकारी सिग्नल स्टाफ पोलीस यांचाही रेल्वे प्रवासी मित्र संघटनेकडून शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन संघटनेचे सत्कार केला. आम्ही दररोज या ट्रेनने प्रवास करतो, त्या ट्रेनमध्ये दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे एक दिवस आधीच आम्ही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दसरा सण साजरा करून ट्रेनची पूजा करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT