Accident News Pudhari
ठाणे

Accident News: मुंबई-वडोदरा हायवेवरील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; बीएमडब्ल्यू गाडीचा चक्काचूर

जखमीला कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर: बदलापुरात मुंबई-वडोदरा हायवेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात बीएमडब्ल्यू गाडीचा अक्षरशः चक्काचूर होवून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.जखमीला कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

रविवारी पहाटे ३ च्या सुमारास हायवेवरून जात असताना मध्यरात्रीच्या अंधारात रस्ता व वेगाचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अलिशान बीएमडब्ल्यू कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली.

ही धडक इतकी भयानक होती की, संपूर्ण परिसरात मोठा आवाज झाला. बीएमडब्ल्यूचा चुराडा झाला. सध्या सोशल मीडियावर या अपघाताबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात अपघातापूर्वी गाडीचा वेग ताशी तब्बल २५१ किमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, महागड्या व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बीएमडब्ल्यूचा अक्षरशः चुराडा झाला आहे. गाडीच्या इंजिनचे तुकडे झाले असून हायवेवर जिकडे तिकडे गाडीचे अवशेष विखुरलेले पाहायला मिळाले.

या अपघातात कारमधील

रेवीका जेकब (वय २४ ) व योगेश नेगी (वय २६) यांचा जागीच मृत्यू होऊन विच्छिन्न अवस्थेत त्यांचे मृतदेह हायवेवर पडले होते. तर उद्योगपतीचा मुलगा असलेल्या अंगद गिल (वय २४) याचा अपघातात जबर जखमी झाला असून त्याला कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.जखमी मुलाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT