माजी नगरसेवक मनोहर डुंबरे  file photo
ठाणे

Manohar Dumbre | भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल

घर हडप करून जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी मनोहर डुंबरे यांच्यावर ॲट्रॉसिटी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर हडप करून जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

फुफानी कंपाऊंड, डोंगरीपाडा किंककाँग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावले यांचे घर आहे. हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावले या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता, संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. तसेच, हे घर मनोहर डुंबरे यांनी दहा लाखाला विकल्याचे सांगितले. यासंदर्भात भाडेकरूने डुंबरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवर बोलणे करून दाखल दिले. मात्र, जुजबी बोलून डुंबरे यांनी फोन बंद केला. त्यामुळे स्वप्नाली सोनावले यांनी पुन्हा डुंबरे यांना फोन केला असता हे घर माझे आहे. तुम्ही कोण आहात? मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे, असे म्हणत डुंबरे यांनी स्वप्नाली सोनावले यांना जातीवाचक शिविगाळ केली होती, असा आरोप पीडित महिलेचे पती अशोक सोनावले यांनी केला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयात १५६ (३) नुसार याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना ९ जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री कासारवडवली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (अ), ३ (१) (४) आणि ३ (१) (९) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे उपस्थित होते.

अशोक सोनावले हा पूर्वी माझा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. मात्र, त्याने माझ्या नावाचा गैरवापर करून सरकारी जागेवर अतिक्रमण करून दुकानाचे गाळे व रूम बांधल्या. तसेच काही जणांकडून पैसे घेतले होते. याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मी तातडीने त्याला कार्यालयात येण्यास मनाई केली. त्याचा राग धरून त्याने समाजाची ढाल उभी करून माझ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा आधार घेऊन खोट्या तक्रारी व माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी निर्दोष असून, या संदर्भात पोलीस तपासात मला निश्चितच न्याय मिळेल.
मनोहर डुंबरे, माजी गटनेता, ठाणे महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT