ठाणे

इसिसच्या आणखी एका दहशतवाद्याला अटक

दिनेश चोरगे

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. सातव्या आरोपीला भिवंडीतील पडघा येथून 'एनआयए'च्या पथकाने अटक केली. शामिल नाचन असे त्याचे नाव आहे. त्याने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली.

एनआयएच्या पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यादरम्यान शामिलला ताब्यात घेण्यात आले. शामिल दहशतवादी कृत्यांसाठी बॉम्ब बनवून त्याच्या वापराचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती समोर आली. तो यापूर्वी अटक केलेल्या अकिब नाचण, जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांसह सात आरोपींच्या साथीने दहशतवाद पसरवत होता. यापूर्वी अटक केलेला अकिब हा शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना भाड्याची खोली दिली होती.

एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेले यापूर्वीचे पाच जण त्यांच्या साथीदारांसह इसिसने काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले होते. या चौघांनी आयडीएस आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले होते.दरम्यान, 28 जून 2023 रोजी एनआयए पथकाने नोंदवलेल्या आयसीआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी संशयतीच्या घरांची झडती घेण्यात आली होती. त्यावेळीही एनआयए पथकाने आरोपींच्या घरांच्या झडती वेळी काही इलेक्ट्रॉनिक गॅझटस् आणि इसिसशी संबंधित अनेक कागदपत्रे यासारखी अनेक गुन्हे करणारे साहित्य जप्त केले होते. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी असुरक्षित तरुणांना प्रवृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे समोर आल्याचे सांगण्यात आले.

भिवंडी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान

गेल्याच वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक व दहशतवादी कृत्यांत सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक झाली होती. मुंब्रा भागातूनही गेल्या दोन वर्षात संशयितां अटक झाली होती. 2014 मध्ये कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये भरती झाले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आजही देशविघातक कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT