sex racket case
सेक्स रॅकेट प्रकरण file photo
ठाणे

ठाण्यातील सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी एक आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील लुईसवाडी येथील हॉटेलमध्ये विदेशी तरुणींना घेऊन वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिला दलालाला शुक्रवारी (दि.२८) अटक करून त्यांच्या ताब्यातील तीन विदेशी तरुणींची सुटका अनैतिक मानवी तस्करी पथकाकडून करण्यात आली. याच प्रकरणात आणखीन एका आरोपी बागडी अब्दुलाह मुघड साद याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. दरम्यान महिला दलालाला शुक्रवारी अटक करून या महिला दलालाकडून बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड हस्तगत करण्यात आले आहे. या महिलेकडे थायलंड

देशाचा व्हिसा आणि मुदत संपलेला पासपोर्ट आढळला. तो जप्त करण्यात आला. सोबत सापडलेले भारतीय बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डही हस्तगत करण्यात आले. दरम्यान थायलंड निवासी महिलेला भारतीय ओळखपत्र आधार आणि पॅनकार्ड कुणी बनविले. याचा शोध घेतल्यानंतर पथकाने मंगळवारी (दि.२५) रोजी बागडी अब्दुलाह मुघड साद या बनावट दस्तावेज बनविणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडे येमेन देशाचा मुदत संपलेला पासपोर्ट आणि व्हिसा आढळला. दरम्यान यावेळी अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध पथकाने केलेल्या कारवाईत अटक केलेल्या थायलंड येथील तीन तरुणींची रवानगी ही महिला सुधारगृहात करण्यात आलेली आहे.

आणखी आरोपी असण्याची शक्यता

अटक केलेल्या दोन्ही आरोपीच्या विरोधात दाखल केलेल्या वेश्याव्यवसाय गुन्ह्यात बनावट दस्तावेजाद्वारे भारतात बेकायदेशीर वास्तव्याच्या गुन्ह्याची वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविलेली आहे.

SCROLL FOR NEXT