आरोपी अक्षय शिंदे चा ‘क्षय’ खेळ खल्लास! pudhari news network
ठाणे

Akshay Shinde : एकाच गोळीत अक्षय शिंदे खल्लास !

पुढारी वृत्तसेवा

ठाणे / बदलापूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे याने सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे पिस्तुल हिसकावून गोळीबार करताच पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडलेल्या एकाच गोळीने अक्षयच्या डोक्याचा अचूक वेध घेतला... त्याने झाडलेल्या गोळ्या केवळ नशिबाने आम्हाला लागल्या नाहीत, अशा शब्दात अक्षयचा एन्काऊंटर करणाऱ्या संजय शिंदे यांनी आपल्या जबाबात सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

तळोजा तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर ठाण्याकडे जाताना धावत्या गाडीतच बदलापूर प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर पोलिसांनी केले, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात ठाणे पोलिसांनी मंगळवारी प्रथमच पत्रकार परिषद घेत एन्काऊंटर कधी व कसा केला याची माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार वारंट घेऊन ठाणे गुन्हे शाखेची टीम अक्षय शिंदेचा ताबा घेण्यास तळोजा कारागृहात गेली होती. पोलीस आरोपीस घेऊन येत असतांना त्याने पोलिसांकडील रिव्हॉल्वर खेचून घेत गोळीबार केला. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, ही मंगळवारच्या (दि.24) अंकात प्रसिध्द झालेली माहितीच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली. मात्र प्रत्यक्ष एन्काऊंटरचा सारा घटनाक्रम कसा घडला हे सांगणे त्यांनी टाळले.

घटनेचा तपास सुरू असून अधिक माहिती लवकरच देण्यात येईल इतकेच साळवी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेपेक्षा अधिक माहिती मिळते ती अशी की, अक्षय शिंदेच्या डोक्यात अचूक नेम धरून गोळी झाडणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या जबाबातून. तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा ताबा मिळवण्यासाठी गेलेल्या पथकात संजय शिंदे यांच्यासमवेत सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, हवालदार अभिक्ति मेरि व हरीश तावडे यांचा समावेश होता. दुपारी २ वाजता जोजा कारागृहाकडे रवाना झालो तेव्हा मी माझ्या पिस्टलमध्ये ५ रालोद केलेले होते असे संजय शिंदे नमूद करतात.

वादग्रस्त कारकिर्द असलेले पोलीस निरीक्षक संजय शिंदे आपल्या जबाबात पुढचा घटनाक्रम सांगतात तो असा...

सोमवारी (दि.23) रोजी ५.३० वाजता, तलोजा मध्यवर्ती कारागृह येथून आरोपी अक्षय शिंदेला तत्ल्यात घेऊन आम्ही पोलिस पथक व्हॅनने ठाण्यावकडे निघाली, मी ड्रायव्हरच्या बाजूस पुढे बसलो होतो व नीलेश मोरे आणि २ अंमलदार आरोपीसह मागील बाजूस बसले होते. आम्ही शिळ डायपर पोलिस ठाण्याजवळ पोहोचली असता सपोनि नीलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरून फोन करून अक्षय शिंदे हा माला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आता मी काय केले आहे? असे रागाने बोलत असून, शिवीगाळ करीत याचे सांगितले. मी वाहन थांबवले. अक्षय शिदेला शांत करण्यासाठ मागील भागात आरोपीच्या समोर पोहवा हरीश तावडे यांच्या बाजूला येऊन असतो. आमच्या समोरच्या बाजूस मोरे व अभिजित मोरे यांच्यामध्ये आरोपी अक्षय शिंदे बसलेला होता.

गाडी मुंब्रा बायपास रोडवर मुंबादेवीच्या पायथ्याजळ पोहोचली असता सण्यासहाच्या सुमारास आरोपी अधष शिंदे हा अचानक मीलेश मोरे यांच्या कमरेला पेंटमध्ये खोचलेले पिस्टल खेनू लागला. मोरे यांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला असता 'मला जाऊ द्या,' असे अक्षय म्हणत होता. या झटापटीमध्ये नीलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले व त्यातील १ राऊंड हा मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. आरोपी अक्षय शिंदे याने मोरे यांच्या पिस्टलचा ताबा घेतला. आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही, असे धमकावू लागला. आरोपी अक्षय शिंदे याने माझ्याहरी तावडे यांच्या दिशेने त्याच्या हातातील पिस्टल रोखून आम्हाला उम मारण्याच्या उद्देशाने २ गोळ्या झाडल्या. आमच्या नशिबाने त्यागल्या आम्हाला लागल्या नाहीत.

आरोपी अक्षय शिंदेचे रौद्ररुप पाहून ती पिस्टलमधून गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार, अशी माझी खात्री झाली. प्रसंगावधान राखून स्वरक्षणार्थ माझ्या पिस्टलने १ गोळी आरोपी अक्षय शिंदेच्या दिशेने झाडाली. अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला, त्याच्या हातातील पिस्टलचा ताबा सुटला. आम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवले वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा येथे आणून मी अक्षय शिंदे व नीलेश मोरे यांना उपचारासाठी दाखल झाले. मोरे व मला पुढील औषधोपचारांसाठी न्यूपिटर हॉस्पिटल येथे दाखल केले. आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत झाला असल्याचे मला नंतर समजले, या वाक्यावर संजय शिंदे यांनी सांगितलेली ही नराधम अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची कहाणी संपते.

पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांची वादग्रस्त कारकीर्द

फक्त एक गोळी झाडून नराधम अक्षय शिंदेचा गेम करणारे पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांची कारकीर्द कशी वादग्रस्त आहे. अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी विजय पालांडे याला पोलिस कोठडीतून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. पालांडेच्या गाडीतच संजय शिंदे यांचा गणवेशही सापडल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्तावही पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला होता. तथापि, पोलिस महानिरीक्षकांनी हा प्रस्ताव नाकारला. २०१४ मध्ये त्यांचा पुन्हा मुंबई पोलिस दलात समावेश करण्यात आला. संजय शिंदे यांनी काही काळ एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबतही काम केले हे विशेष.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT