बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Image source- X)
ठाणे

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

बदलापूर येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील (Badlapur School Case) आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिरमधील चार वर्षीय दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती.

बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून गेल्या मंगळवारी (दि.२०) उद्रेक झाला होता. संबंधित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पालक आणि आंदोलकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यातच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे संतापाचा कडेलोट झालेले पालक आणि आंदोलकांकडून शाळेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवरही उतरला होता. दरम्यान, शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या घरावरदेखील संतप्त आंदोलकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात घराची नासधूस करण्यात आली होती.

सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांच्या ताब्यात 

बदलापुरातील (Badlapur School Case) ज्या शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाला; त्या शाळेतील सीसीटीव्ही डीव्हीआर (CCTV DVR) स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाच्या विविध अंगाने तपास करत आहे. दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडण्यापूर्वी आणि त्यानंतर शाळेच्या परिसरात आजूबाजूला असलेले सीसीटीव्हींचे डीव्हीआर पोलीस तपासून पाहत असून ते डीव्हीआर स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या ताब्यात घेतले आहेत. ही घटना घडण्यापूर्वी तसेच घटना घडल्यानंतर आणि आंदोलनादरम्यान शाळेची झालेली तोडफोड या साऱ्याचे रेकॉर्डिंग या डीव्हीआरच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती लागले आहे. (Badlapur school sexual abuse)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT