women Trafficking
तरुणींची देहविक्री करणाऱ्या महिलेस अटक Pudhari File Photo
ठाणे

डोंबिवली : नोकरीच्या अमिषाने तरुणींची देहविक्री करणाऱ्या महिलेला अटक

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : नोकरीच्या अमिषाने डोंबिवलीत आणून देहविक्री करत असल्याची घटना समोर आली आहे. तरुणींची फसवणुक करणाऱ्या महिलेला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनामिका राजू छत्री (वय. 22 रा. मातोश्री इमारत, वर्सोवा मंदिर समोर, अंधेरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ही महिला मुळची आसाम राज्यातील गुवाहाटी भागातील रहिवासी आहे.

वेगवेगळ्या भागांतील मुलींना नोकरीचे अमिष

वेगवेगळ्या भागात नोकऱ्यांचे देण्याचे आमिष दाखवून 20 ते 30 वयोगटातील तरूणींना इतर शहरांमधून कल्याणमध्ये आणायचे. त्यानंतर त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन या तरूणींच्या देहविक्रीच्यामाध्यमातून बक्कळ पैसा कमावयचा, असे रॅकेट चालवलेल्या अंधेरीच्या एका तरूणीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई कल्याणमधील हॉटेल गुरूदेव ॲनेक्स परिसरात करण्यात आली.

मागील आठवड्यामध्ये अनामिकाने उल्हासनगर भागातून एका गरजू तरूणीला पैशाचे आमिष दाखवून सोबत घेतले होते. त्यानंतर तिला कल्याणमध्ये आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. अशा अनेक अनामिक दररोज अनेक तरूणींची फसवणूक करत असल्याच्या गोपनीय तक्रारी खडकपाडा पोलिसांना मिळाल्या होत्या. तेव्हापासून पोलिस अनामिकेच्या मागावर होते.

महिलेला देहविक्री करताना रंगेहात पकडले

या माहितीच्या अधारे खडकपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धनंजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कल्याण भागात सापळा रचला. त्यावेळी अनामिका छत्रीसह पीडित तरूणी आणि एक ग्राहक एकत्रितरित्या पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अनामिका छत्री हिला अटक केली. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये अनामिका छत्रीच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT