minor Boy
File Photo  
ठाणे

भिवंडीत मदरशातील अल्पवयीन मुलावर अत्याचार

अल्पवयीन मुलावर अत्याचार आरोपी फरार; गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका ११ वर्षीय अल्पवीयन मुलावर २० वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील एका मदरशात घडली

याप्रकरणी २० वर्षीय तरुणाच्या विरोधात शांतीनगर पालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नसिरुल्ला असे अत्याचारी तरुणाचे नाव असून तो फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील पिराणी पाडा परिसरातील मदरशात पीडित अल्पवयीन मुलगा व आरोपी नसिरुल्ला हे दोघे शिक्षण घेत आहेत. त्यातच २४ ते २५ जून रोजीच्या दरम्यान नसिरुल्लाने पीडित ११ वर्षीय मुलावर अत्याचार केला. मात्र या घटनेनंतर पीडित मुलाला त्रास असहाय्य झाल्याने त्याने त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचे कथन आईला सांगितले. ही घटना ऐकून तिने पीडित मुलाला घेऊन शांतीनगर पोलीस ठाणे गाठून मुलावर घडलेला प्रसंग सांगताच २६ जून रोजी पहाटेच्या सुमारास अत्याचारी तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल करताच पोलिसांनी पोक्सो कलम ३७७ न्वये नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची कुणकुण लागताच आरोपी नसिरुल्ला मदरशातून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.