ठाणे

कल्याण-डोंबिवली : अनधिकृत बांधकामप्रकरणी २७ विकासकांवर गुन्हा दाखल

अविनाश सुतार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्र बनवून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी कल्याण- डोंबवली महापालिकेने मानपाडा पोलीस ठाण्यात एकाचवेळी २७ विकासकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे शहरात राजरोसपणे सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर नेमका वरदहस्त कोणाचा ? अशी चर्चा शहरभर दबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान, आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार अर्जही सादर केला होता. त्यानंतर केडीएमसीकडून झालेल्या पडताळणीमध्ये बांधकाम परवानग्या बनावट असल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

कल्याण- डोंबिवली शहर अनधिकृत बांधकामासंदर्भात नेहमीच चर्चेत असते. अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर अधिकारी फुटकळ कारवाई करतात. त्यानंतर पुन्हा बांधकामांना वेग येतो. मात्र, यावेळी कल्याण- डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ठोस पावले उचलत ६८ परवानग्या बनावट कागदपत्रे तयार करून दिल्या गेल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

विशेष म्हणजे या बनावट कगदपत्रांच्या आधारे त्यांनी रेरा रजिस्ट्रेशन करून घेतल्याचे समोर आले. विकासकांवर गुन्हे दखल करण्यात आले असून रेरा संस्थेशीही यासंदर्भात संपर्क साधण्यात येत आहे. केडीएमसीकडून विकासकांना देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्या केडीएमसीच्या वेबसाईटवरही टाकल्या जात असून रेरा आणि आपली वेबसाईट जोडण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नसल्याचेही आयुक्त डॉ. दांगडे यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात याचिका दाखल

२७ गावांमधील २७ बांधकाम आणि डोंबिवली विभागातील ३९ बांधकाम परवानग्या असे मिळून एकूण ६७ बांधकाम परवानगी आदेश बनावटरित्या तयार करण्यात आले. त्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी जनहित याचिकेमध्ये नमूद केले आहे. या बांधकाम परवानग्यासंदर्भात पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडेही लेखी तक्रार केली आहे. त्यावरून केडीएमसीच्या नगररचना विभागातील सहायक संचालकांनी या बांधकाम परवानग्या तपासल्या असता त्या बनावट असल्याचे आढळून आल्याचेही पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT