ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.५) सुमारे ७३ टक्के मतदान झाले. यामुळे सरपंचाच्या १३५ उमेदवारांचे आणि सदस्यपदाच्या ७१५ उमेदवारांचे भविष्य सोमवारी मतमोजणी होईपर्यंत ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. तर पोटनिवडणुकीसाठी सुमारे ७० टक्के मतदान झाले. (Gram Panchayat Eelction)
ठाणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकापैकी १२ ग्रामपंचातीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळें आज ४८ ग्रामपंचातीच्या थेट सरपंचाच्या निवडणुकीसाठी १३५ आणि सदस्यपदासाठी ७१५ सदस्याने आपले नशीब आजमावले आहे.
पोटनिवडणुकीसाठी ७० जण सदस्यपदासाठी आणि एक थेट सरपंचपदासाठी आपले नशीब आजमावले. (Gram Panchayat Eelction)
भिवंडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी सुमारे ६९ टक्के मतदान झाले. साडेतीन वाजे पर्यंत ५९.५६ मतदान झाले होते. दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मुरबाड तालुक्यातील १९ ग्राम पंचायती मध्ये सुमारे ८६ टक्के मतदान झाले. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ७६.७१ टक्के मतदान झाले होते. दहा ग्राम पंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. शहापूर तालुक्यातील १६ ग्राम पंचायती मध्ये सुमारे ७० टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ६०.८५ टक्के मतदान झाले होते. एकूण जिल्ह्यात सुमारे ७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम आकडेवारी येई पर्यंत टक्केवारीत कमी जास्त प्रमाण होऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या थेट सात सरपंच आणि १६३ सदस्यांसाठी निवडणूक होती. थेट सरपंचाच्या सात जागांपैकी फक्त एकाच ठिकाणी निवडणूक होत असून सदस्यपदांसाठी ७७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ३१ सदस्यांची निवड बिनविरोध झाली असून सात ग्रामपंचातीमध्ये अर्जच दाखल झाले नव्हते. या १७ रिक्त पदासाठी आज ७० टक्के मतदान झाले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.