डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
गोरगरिबांसाठी आशेचा किरण ठरलेली राज्य सरकारची आपला दवाखाना योजना अखेर बंद पडली आहे. शहरांतील ५४ दवाखान्यांना एकाच वेळी कुलूप लागल्याने मोफत उपचारांचे स्वप्न भंगले असून गोरगरिब रुग्णांचे डोळ्यात पाणी दाटणारी परिस्थिती दिसून येत आहे.
तब्बल २०० कोटी रुपयांची थकबाकी सरकारने थकवल्याने राज्यभरातील हजारो दवाखान्यांचे दिवे विझले आहेत, त्याची सर्वात मोठी झळ कल्याण-डोंबिवलीतील सामान्य कुटुंबांना बसली आहे. शहरांतील ५४ दवाखान्यांना एकाच वेळी कुलूप लागल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
ज्या दवाखान्यात अवघ्या दहा रुपयांत डॉक्टर तपासायचे, रक्तदाब शुगर तपासणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन हिंदुधुनगसकार बाळासाहेव ठाकरे व्हायची आणि मोफत औषधं मिळायची, तिथे आज शुकशुकाट आहे. दारावर लटकणारं कुलूप पाहून हातात प्रिस्क्रिप्शन घेऊन आलेल्या वृद्ध आजी-आजोबांचे चेहरे हिरमुसले, लहान बाळाला घेऊन आलेल्या आईची पावलं जड झाली, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला आता काम बुडवून लांबच्या खासगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची आरोग्य यंत्रणा आधीच तोकडी आहे, शासकीय रुग्णालयात तासन्तास रांगा, त्यात हे ५४ दवाखाने बंद झाल्याने गरीब रुग्ण अक्षरशः वाऱ्यावर फेकला गेला आहे.
खासगी रुग्णालयात दोनशे-तीनशे रुपये फी, त्यावर तपासण्या आणि महागडी औषधं, हे गणित जुळवताना अनेक कुटुंबांचं बजेटच कोलमडत आहे. त्यामुळे अनेकांनी आजार अंगावर काढायला सुरुवात केली आहे, हे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. या प्रश्नावर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. निवडणुकीपुरती रकारने योजनांची गोड आमिषे दाखवली, मतं मिळवली आणि आता गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला, अशी संतप्त प्रतिक्रिया रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
थकबाकी चुकवावी...
ही योजना बंद करण्याचा प्रकार म्हणजे, हा गरिबांवर झालेला अन्याय आहे, असा घणाघातही त्यांनी केला. सरकारने तत्काळ २०० कोर्टीची थकबाकी चुकती करून हे सर्व दवाखाने पुन्हा सुरू करावेत, जेणेकरून झोपडपट्टीत राहणाऱ्या आईला, हातावर पोट असणाऱ्या मजुराला आणि वयोवृद्धांना पुन्हा स्वस्त आणि घराजवळ उपचार मिळेल, अशी आर्त मागणी काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केली आहे.