ठाणे

Police Officer Transfer : ४२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पंजाबराव उगले ठाण्याचे सह पोलीस आयुक्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्य पोलीस दलातील ५ अपर पोलीस आयुक्त आणि २९ पोलीस उपायुक्त अशा एकूण ४२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ठाण्यातील उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, एस. एस. बुरसे (ठाणे शहर), श्रीकांत परोपकारी (मुख्यालय), शशिकांत बोराटे आणि पोलीस अधीक्षक स्वामी या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, ठाणे ग्रामीण अधिक्षकपदी विनय राठोड, तर अपर पोलीस आयुक्त म्हणून अशोक दुधे आणि शिवाजी राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक पंजाबराव उगले यांची येत्या काही दिवसांत ठाण्याचे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या जागी नियुक्ती होणार आहे.

सरकारी विभागांमधील बदल्या सुरू झाल्या आहेत. आज राज्यातील नागपूरचे अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांची ठाणे येथे बदली करण्यात आली असून, पुण्याचे प्रमोद शेवाळे यांच्याकडे नवी मुंबई गुन्हे विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनिता साहू यांची उपमहानिरीक्षक, राज्य राखीव दलाच्या ठिकाणी नियुक्ती झाली असून, त्या जागेवर असलेले अशोक दुधे आता ठाण्यात काम करतील. आर. राजा यांना पदोन्नतीवर बिनतारी संदेश विभाग, मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांची नवी मुंबई येथे 'डायल ११२' च्या अधिक्षकपदी, एस. एस. बुरसे यांची उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग आणि श्रीकांत परोपकारी (मुख्यालय) यांची सागरी सुरक्षा उपायुक्त (गुप्तवार्ता, मुंबई) म्हणून बदली झाली आहे; तर शशिकांत बोराटे यांची राज्य पोलीस नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. कोल्हापूरचे उपायुक्त धीरज कुमार, मुंबईतून विवेक पानसरे आणि नवी मुंबईतील निलेश सोनावणे हे आता ठाण्यात उपायुक्त म्हणून काम पाहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT