दाओस दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंड झ्युरिक येथे स्‍वागत करण्यात आले. Image Source X
महाराष्ट्र

स्‍विझर्लंडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्‍लोषी स्‍वागत

CM Devendra Fadnavis | बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड यांच्यातर्फे आयोजन, फडणवीस यांनी साधला मराठी बांधवांशी संवाद

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दाओस येथ वर्ल्ड इकॉनॉमी फोरमसाठी गेलेले महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पारंपरिक मराठी वाद्यांच्या गजर करण्यात आला. लेझिम खेळून त्‍यांचे स्‍वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की ‘बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे, आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस असून देश 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याप्रसंगी बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्‍यान बृहन महाराष्ट्र मंडळ यांच्याबरोबरच हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्या वतीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्‍वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT