लाठी फिरविण्याचा विक्रम 
सोलापूर

सोलापूर : सलग 75 मिनिटे लाठी फिरविण्याचा विक्रम

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त येथील कराटे व शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षक अश्विन कडलासकर यांनी सलग 75 मिनिटे लाठी फिरविण्याचा विक्रम केला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

15 ऑगस्ट रोजी शिवस्मारक सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंदनेने व दीपप्रज्वलनाने उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सलग 75 मिनिटे अर्थात् सव्वातास नियोजित वेळेपेक्षा जास्त लाठी फिरवित भारत मातेला आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली. अश्विन कडलासकर यांचा हा सोलापूरातून लिमका बुकसाठी तिसरा विक्रम आहे. याआधी सुद्धा त्यांनी 750 वेळा डबलसीट मोटारसायकल आपल्या पोटावरून घेऊन जाण्याचा व 590 टयुब लाईटच्या नळ्या डोक्यापासून ते पायापर्यंत मारुन फोडण्याचा विक्रम केला आहे. लाठी फिरविण्याच्या विक्रमासाठी त्यांनी शिवराम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला.

या विक्रमानंतर आ. प्रणितीताई शिंदे, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक विनोद भोसले, बिल्डर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दत्ता मुळे, माजी महापौर मनोहर सपाटे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, श्रीकृष्ण केंद्राचे संस्थापक भरत मेकाले, लाठी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अजय शहा, लाठी इंडियाचे उपाध्यक्ष शिवराम भोसले, लाठी असोसिएशनचे टेक्निकल डायरेक्टर म.रफी शेख यांच्या उपस्थितीत सत्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT